२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन सुरेश बिराजदार यांचे प्रतिपादन
उमरगा : भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने
मागील २७ वर्षात नेत्र दीपक प्रगती केली आहे.आगामी काळात लातूर जिल्ह्यात बँकेच्या नवीन शाखा चालू करण्यात येणार असून बीड ,सोलापूर जिल्ह्यात बँकेचे कार्यक्षेत्र वाढवण्यात येणार असल्याची माहिती दि २४ रोजी बँकेच्या २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रा. सुरेश बिराजदार यांनी दिली. यावेळी संचालक सुनील माने, गोविंदराव साळुंखे ,विजयकुमार सोनवणे , अॅड.व्यंकट सोनवणे ,साहेबराव पाटील ,संजय गायकवाड, शिवाजीराव मोरे , मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. उमरगा ची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शहरातील श्री गणेश सभागृह येथे रविवारी संपन्न झाली. प्रारंभी कै आ. भाऊसाहेब बिराजदार यांच्या व महालक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना चेअरमन श्री बिराजदार म्हणाले की कै. आ.भाऊसाहेब बिराजदार यांच्या प्रेरणेने १९९६ साली बँकेची सुरुवात झाली. जिल्ह्यात सात शाखा सह बँकेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. 2016 साली 35 कोटी ठेवी होत्या मात्र आज दीडशे कोटीचा टप्पा बँक पूर्ण करीत आहे ही कौतुकाची बाब आहे. बँक कायमस्वरूपी अ वर्गात आहे .बँकेचा यंदाचा नफा ९७ लाख असुन बँक तीन महिन्यात एटीएम सेवा सुरू करीत आहोत. कर्ज वाटपासाठी बँकेकडे 30 कोटी शिल्लक असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले की चांगले वेळेवर भरणा करणारे कर्जदार मिळत नाहीत .तरी अशा व्यवसायीक ,कर्जदाराच्या दारापर्यंत जाऊन कर्ज देणे काळाची गरज आहे. नवीन तरुणांना उभारी देण्यासाठी बँक सदैव प्रयत्नशील आहे. गेल्या वर्षी बँकेचा रोप्य महोत्सव राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला . राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे या बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी विशेष लक्ष आहे. त्यांचे मोठे योगदान आहे. धाराशिव जिल्ह्यात सात शाखा असून लातूर जिल्ह्यात लातुर,मुरुड, किल्लारी ,औराद शहाजनी येथे शाखा सुरू करण्यात येणार आहेत.तसेच सोलापूर, बीड हे जिल्हे बँकेच्या कार्यक्षेत्रात घेण्यासाठी परवानगी प्रस्ताव रिझर्व बँकेकडे पाठवण्यात आला आहे .

प्रास्ताविक संचालक साहेबराव पाटील, अहवाल वाचन मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश शहापुरे, सूत्रसंचालन अमोल पाटील, आभार संचालक व्यंकटराव सोनवणे यांनी मांनले नाना भोसले, माजी जि प सभापती गोविंदराव पवार, कर्ज वितरण अधिकारी दयानंद बिराजदार, चिफ अकाउटंट संदीप जाधव, शाखाधिकारी ब्रिजेस बिराजदार, सुरेंद्र पाैळ, बाळासाहेब शिंदे, मोहन तांबे , सतीश सुरवसे,दत्तात्रय माळी,मुकेश माने आदीसह सभासद कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विजयानंद चव्हाण, संतोष शिरगुरे, राहुल गुरव,रघुनाथ पाटील ,केदार मुळे, आबा रामतीरे, मेघा जगदाळे, भावना बिराजदार, पवन जगताप, तुषार चव्हाण, बळी चव्हाण, राजू राठोड आदींनी परिश्रम घेतले.
—-//——
“जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकेच्या अडचणी सोडवण्यासाठी व त्या समजुन घेवुन उपाय योजना करण्यासाठी जिल्ह्यात बँक असोसिएशनसाठी पुढाकार घेतला असून सोमवारी दि.२५ रोजी धाराशिव येथे उस्मानाबाद जिल्हा बँकेत वसंतराव नागदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकेचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निमंत्रीत केले आहे”- सुरेश बिराजदार (चेअरमन,भाऊसाहेब बिराजदार अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक)