सचिन बिद्री:धाराशिव : नांदेड नेरली येथे ४३ वर्षा पासुन कार्यरत असलेली समाजसेवी संस्था मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित नेरली कुष्ठधाम या समाजसेवी संस्थेला उमरगा येथील स्मृतीशेष सौ .शीला गायकवाड (सगर)यांच्या स्मरणार्थ मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित सौ शीला तुकाराम गायकवाड स्मृती उद्यान ऍग्रो टुरिझम ,नेरली उभारण्यासाठी श्री तुकाराम गायकवाड व उमरगा येथील सगर कुटुंबीयांच्या वतीने पाच लाख रुपयाचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष सुनीलरावजी कदम यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी संस्थेचे विश्वस्त सचिव हंसराज वैद्य ,कोषाध्यक्ष विजय मालपाणी, सहसचिव राजेश लोटिया, विश्वस्त तुकाराम गायकवाड ,प्रा.किरण सगर, अमोल पाटील, सोनाली सगर यांची प्रमुख उपस्थिती होती. नुकतेच मराठवाडा लोकसेवा मंडळ संचलित नेरली कुष्ठधाम येथे व्यवस्थापक पदावर कार्यरत असणाऱ्या उमरगा येथील सौ शीला तुकाराम गायकवाड ( सगर)यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची आठवण चिरकाल राहावी यासाठी त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने त्यांच्या स्मरणार्थ सौ.शीला तुकाराम गायकवाड स्मृती उद्यान ऍग्रो टुरिझम ,नेरली हा प्रकल्प उभारण्यासाठी पाच लक्ष रुपयाचा निधी संस्थेकडे सुपूर्द केला आहे. यावेळी संस्थेचे विशेष निमंत्रित द्वारकादास अग्रवाल, हर्षद शहा, विश्वस्त डॉ. संजय कदम, बनारसीदास अग्रवाल, व सुचिता पाटील , संस्थेचे सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.