आरोग्य विषयाला अनुसरून लोखोंच्या जाहीराती पण रुग्णालयात औषधांचा तूटवडा.?
सचिन बिद्री:धाराशिव
सावंत साहेब तुम्ही मंत्री म्हणून नको एक सामान्य नागरिक म्हणून या दवाखान्यात येऊन स्वतः डोळ्यांनी पहा,अनुभव घ्या,वेशांतर करून या सत्य जाणून घ्या.
एकीकडे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत आरोग्य विषयावर लाखो रुपये केवळ जाहिरातीवर खर्च करताना दिसून येतात तर स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात मात्र आरोग्य व्यवस्था दम तोडत असलेली चित्र समोर येत आहे.यामुळे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा लोहारा तालुक्यातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सप्टेंबर आणि आक्टोबर महिन्यात दिवसेंदिवस डेंगू सदृश्य आजाराने थैमान घातले आहे. सर्दी, थंडी ताप, खोकला, घशात खवखव, असे अनेक लक्षणे रुग्णमध्ये सर्रास पाहवयास भेटत आहेत.आर्थिक परिस्थितीने कमकुवत, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, मध्यमवर्गीय व्यक्ती पहिल्यांदा मोठ्या अपेक्षेने शासकीय रुग्नालयात उपचारासाठी जातो तेंव्हा त्याला केवळ दोन नमुन्याच्या गोळ्या दिल्या जातात. त्रासाने ग्रस्त पिडीत रोगी शेवटी आपलं उपचार करण्यासाठी खाजगी रुग्णालयात जातो तेंव्हा त्याला काही समाधान लाभतो.मग अखेर शासकीय रुग्णालये कोण्या कामाची..?कोव्हीड काळात अशी काही लक्षणे आढळून आल्यास एक विशिष्ट टेस्ट व्हायची औषधोपचार व्हायचं पण आता का दुर्लक्ष होतोय..?सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे असल्यास अँटीजेन टेस्ट करून घेण्याबाबत प्रशासन नागरिकांना आवाहन करायचे आता का झोपी गेलाय प्रशासन..?महिन्याला 22 लाख रुपये उमरगा शहर स्वच्छतेसाठी खर्च होतोय तरी शहरांतील प्रत्येक वार्डात अस्वछता, घाणीचे साम्राज्य आणि डासांचा प्रादुर्भाव दिसून येतोय मग नेमकं महिल्याला खर्च होणारा 22 लाख रुपये जातात तरी कोणाच्या घशात.?शहरातील व परिसरातील गोरगरीब जनतेच्या आरोग्यविषयक प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना आत्यल्प अगदी पन्नास रुपयात औषधोपचार करून चांगले आरोग्य देणारे डॉ कपिल महाजन आणि डॉ अमरदीप मम्माळे या दोन डॉक्टरांना तालुक्यातील जाणता गरिबांचा डॉक्टर अशी अनोखी पदवी बहाल केली आहे.
शासन आपल्या दारी योजना खरंच असली असती तर शेकडो शेतकरी, विद्यार्थी, अनाथ व विधवा, वयोवृद्ध महिला पुरुष आपलं हक्क (योजना)प्राप्त करून घेण्यासाठी पंचायत समिती व तहसील कार्यालयाच्या हेलपाटा मारल्या नसत्या. दररोज या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी येण्यापूर्वीच पिडीत, शोषित आणि वंचित नागरिकांची रांग लागलेली दिसून येते. मग शासन आपल्या दारी ही योजना किती यशस्वीपणे राबविण्यात आली असावी याची केवळ कल्पनाच करू शकतो.
चांगले आरोग्य आणि उत्तम शिक्षण या मूलभूत गरजा असताना याकडे शासन प्रशासन जाणीवपूर्वक पाठ फिरवत आहे कि काय असा प्रश्न नागरिकांना मनात घर करून राहिलाय.एकीकडे वस्ती वाड्यावरील जि प शाळा बंद..? आहेत ज्या काही जि प शाळा त्याचे खाजगीकरण, दिवसा शिक्षण आणी रात्री लावणी.? खाजगी रुग्नालयांची भरभराटी होण्याहेतु शासकीय रुग्णालयाची जाणीवपूर्वक हेळसांड.?
कोणी शारीरिक कष्ट करतो तर कोणी बुद्धीचा वापर करून पैसा कमवितो, कमाविलेल्या पैशातून प्रत्येक नागरिक वेगवेगळ्या स्वरूपात सरकारला टॅक्स भरत असतो. टॅक्स च्या स्वरूपात प्राप्त रकमेचा लोकप्रतिनिधीनी जनतेच्या सुख, सोई तथा समृद्धी साठी निधी खर्च करावा अशी एक अपेक्षा मतदार करत असेल तर यात काय चुकलं..? लाखोंचा पगार घेता, रेल्वे प्रवास, एस टी प्रवास, विमान प्रवास मोफत वेगवेगळे भत्ते आणि जनतेच्याच पैशातून मोठमोठ्या जाहिराती प्रकाशित करणे पण प्रत्यक्षात जनतेला गाजर दाखवने हे सर्वसामान्य जनतेला पचणी पडणार नाही. आता जणता टी वी चॅनल्स पाहण्यापेक्षा सोशल मीडियावर जास्त असते, म्हणजेच सत्य बाबी जनतेपासून लपवू शकत नाही, कोणी कितीही प्रयत्न केला तरी सत्य बाहेर पडतोच.
“राज्याचे आरोग्यमंत्री ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्याच जिल्हातील आरोग्य यंत्रणा जर कोलमडून जात असेल तर सर्वप्रथम पालकमंत्र्यांनी आपल्या पदाचा व आमदारकीचा राजीनामा द्यावा”— शिवश्री शरद पवार, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड
“रुग्णालयात औषधंचा तूटवडा नसून मुबलक प्रमाणात औषधे आहेत. गेल्या काही दिवसात दुप्पट तिप्पट संख्येने रुग्ण येत आहेत, दररोज अंदाजे 400 ते 500 रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयात इलेक्ट्रिक ऑडिट होणे अत्यंत आवश्यक आहे, मशणरी जळने, लोड येणे, स्पर्किंग होऊन आग लागणे आदी घटना घडत आहेत. दहा दिवसापूर्वी एका महत्वाच्या कक्षात अर्धा तास आग लागली होती सुदैवाने जीवितहानी झाली नाही, तसेच ड्रेनेज सिस्टीम दुरुस्ती होणे पण अत्यावश्यक आहे, यामुळे दुर्गंधी वाढत आहे”— डॉ विनोद जाधव, वैद्यकीय अधीक्षक उमरगा उपजिल्हा रुग्णालय
“मी स्वतः दवाखान्यात जाऊन उपस्थित डॉक्टरांची कानउघडनी केली, निदान आठ तास तरी इमानेइतबारी सेवा द्या अशी आर्त हाक देत विनवानी केली, येथील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांत उदासीनता दिसून आली”– महावीर अण्णा कोराळे, जेष्ठ नागरिक
घोषणा आणि जाहीरातींचा भडीमार, नागरिक मात्र हैराण..
शिंदे-फडणवीस-अजित दादा या एक फुल दोन हाफ सरकारच्या वतीने अनेक घोषणांचा,जाहीरातींचा, तथाकथित विकास कामांच्या आकडेवारीचा भडीमार होतोय,वास्तवात मात्र जनतेला अस्वच्छता, रोगराई, आरोग्य व्यवस्थेच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराने घातलेले मृत्यूचे तांडव, शिक्षण क्षेत्राचा बाजार, प्रशासनातील दिरंगाई आणि वाढता भ्रष्टाचार, नोकऱ्यांतील कंत्राटीकरण अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
उमरगा शहरातील मुख्य रस्त्यालगत ड्रेनेजलाईन नसल्याने दुर्गंधीयुक्त पाणी सतत वाहत असते. करोडो रुपयांचे निधी आले असे सांगितले जाते. पण शहर मात्र भकास आहे. उपजिल्हा रुग्णालयासह प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे याठिकाणी मुबलक मनुष्यबळ, औषध-गोळ्या, अत्याधुनिक सेवा-सुविधा नसल्याने व खुद्द शासकीय दवाखान्यातच कमालीची अस्वच्छता असल्याने तिथे जाणारा रुग्ण बरा होण्याऐवजी तिथली दुरावस्था पाहून मानसिक आणि शारिरिकदृष्ट्या अजूनच खचत आहे.”— ॲड.शीतल शामराव चव्हाण,सामाजिक कार्यकर्ते