(उमरगा:प्रतिनिधी)
शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा मनोहर धोंडे आणि महाराष्ट्र राज्य चिटणीस सातलिंग स्वामी यांच्या लेटरहेडवर सदर नियुक्ती पत्र दी 8 रोजी शासकीय विश्रामगृहात आयोजित सोहळ्यात मान्यवरांच्या उपस्थितीत कसगी येथील सामाजिक कार्यकर्ते शिवराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
यावेळी सातलिंग स्वामी यांच्यासह संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार,बालाजी सार्गे, नितीन पवार, राहुल पुजारी,गुरुलिंग स्वामीं,सचिन शिरगिरे, राजेंद्र शिरगिरे, धनराज माशाळे , धनाजी माशाळे, शीसैल टनसाळे, सुरज पाटील, शिवानंद स्वामीं, विशाल देशमूख, भिम यादगौडा, संजय रेणुके व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.
कार्यक्रमात प्रास्ताविक सातलिंग स्वामींनी मांडले व सूत्रसंचालन अण्णासाहेब पवार यांनी केले. कसगी गाव व परिसरात अत्यंत तळमळीने सर्वासामान्य जनतेच्या अडचणी सोडविण्यात शिवराज पाटील हा युवक नेहमी पुढाकार घेत असतो यापुढे आता शिवा संघटनेच्या माध्यमातून पाटील यांच्या सामाजिक कार्यालय उजाळा येईल अशी अपेक्षा सातलिंग स्वामींनी व्यक्त केली.
शिवराज पाटील यांच्या नियुक्ती मुळे पाटील मित्र परिवारातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.