प्रतिनिधी नळदुर्ग:-
केंद्रीय पेट्रोलियम राज्यमंत्री श्री.रामेश्वर तेली यांच्या हस्ते राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे कार्यरत असलेले तथा सामाजिक कार्यकर्ते श्री.उमाकांत मिटकर यांना “मराठवाड्याचे शिल्पकार”हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
वृंदावन फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून सदरील कार्यक्रम आयोजित केला होता. वृंदावन फौंडेशन ही राज्यस्तरावर काम करणारी संस्था आहे.समाजात निरपेक्षपणे कार्य करणाऱ्या प्रेरणादायी व्यक्तींना ही संस्था पुरस्कार देते.यासाठी कोणाकडूनही अर्ज मागवले जात नाहीत.सदरील संस्थेने मराठवाडा मुक्ती संग्राम अमृतमहोत्सवी वर्ष सांगता निमित्ताने मराठवाड्यातील उदयोन्मुख तरुणांईशी संवाद व त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून पुरस्कार दिला गेला.
पोलीस तक्रार प्राधिकरण
उमाकांत मिटकर हे गेल्या एक तपाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.त्यांच्या याच सामाजिक कार्यावर आधारित अल्पावधीतच दोन आवृत्ती प्रकाशित झालेले डिव्हाईन जस्टिस हे आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले आहे. याच पुस्तकाची इंग्रजी व हिंदी आवृत्ती ही प्रकाशित होत आहे.श्री.मिटकर यांना 57 राज्यस्तरीय व जागतिक स्तरावरील यूनिस्कोचा एक पुरस्कार ही प्रदान करण्यात आला आहे.याच कार्याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण येथे त्यांची नियुक्ती झाली आहे.
पुणे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात झालेल्या या दिमाखदार कार्यक्रमात मराठवाड्यातील अनेक मान्यवर,पत्रकार,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.