section and everything up until
* * @package Newsup */?> धावते आयशर वाहन घुसले मजुराच्या टीन शेडमध्ये.. | Ntv News Marathi

४ मजुरांचा मृत्यू तर ९ जखमी..

जखमींवर मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू..

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील चौपदरीकरणाच्या कामाकरिता असलेल्या मजुरांच्या रस्त्यालगत असलेल्या टीन शेड वर आयशर वाहनावरील नियंत्रण सुटून धडक देऊन झालेल्या अपघातात ४ जण ठार तर ९ जण जखमी झाल्याची घटना आज पहाटे ५ वाजे दरम्यान वडनेर भोलजी नाजिक असलेल्या उड्डाण पुला जवळ घडली.
या बाबत सविस्तर वृत्त असे की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून खामगाव कडे जाणारे आयशर क्र. पी बी ११ सी झेड ४०७४ या आयशर वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वडनेर भोलजी नजीक असलेल्या उड्डाणपुलाजवळ मजुराच्या राहण्याकरीता उभारलेल्या टीन शेड ला जबर धडक दिली या धडकेत 1.प्रकाश मकु धांडेकर वय 26 वर्षे,2. पंकज तुळशीराम जांबेकर वय 19 वर्षे, 3.राजाराम दादू जांबेकर वय 35 वर्षे, 4.अभिषेक रमेश जांबेकर वय 18 वर्षे, सर्व रा. मोरगड ता.चिखलदरा, जि. अमरावती या चार जणांचा मृत्यू झाला आहे तर

  1. दीपक पणजी बेलसरे 2.कमल रमेश जांभेकर, 3.अमर बजू , 4. शाम भास्कर सर्व. रा. मोरगड, 5.गुणी भुया भोगर भुया रा. बोरीमतोली तह. गढवा
    6.अक्षय कुमार श्री कुमार भैय्या रा. चिनीया तह. गढवा
  2. सतपाल कुमार मलिकचंद रा.बोरी मातोली
    8.महेश मोची रा.बोरी मातोली जि. गढवा
    9.आशिष कुमार निर्मल भुयार रा. बोरी मातोली हे नऊ जण जखमी झालेले आहे
    4 मृत व 09 जखमी असे एकुण 13आहेत. या अपघातातील जखमींवर मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *