जिल्हा विधी प्राधिकरण धाराशिव च्या वतीने दिव्यांग व्यक्ती कायदे व अधिकार विषयक यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हापरिषद धाराशिव आयोजन करण्यात आले .कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणूण मा.श्रीमती अंजू एस.शेंडे मॅडम, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश तथा अध्यक्षा जिल्हा विधी प्राधिकरण समिती,उस्मानाबाद तसेच दिवाणी न्यायाधिश वरिष्टस्तर, उस्मानाबाद मा.एस.एस.माने मॅडम,जिल्हा विधी प्राधिकरण सचिव न्यायाधिश मा.वसंत यादव साहेब,ॲड.अमोल गुंड साहेब,समाज कल्याण विभागाचे चव्हाण साहेब दिव्यांग महामंडळाचे कांबळे साहेब,प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,राष्ट्रवादी दिव्यांग सेल चे अध्यक्ष प्रदीप डोके,काशिनाथ शिंदे,आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी अधिकार विषयक जनजागरण करून,पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनेचे लाभ देखील वाटप करण्यात आले यावेळी दिव्यांग व्यक्तीसाठी फायदेशीर असा कार्यक्रम घेतल्याबद्दल प्रहरच्या वतीने जिल्हा विधी प्राधिकरण च्या सर्व मान्यवरांचे आभार मानले तसेच बालाजी नादरगे सर यांनी दिव्यांग बांधवांना कायदेविषयक व विविध योजनांविषयी मार्गदर्शन केले यावेळी बाळासाहेब कसबे, बाळासाहेब पाटील,महंमद आतर, श्रीमंत गरड,दत्ता पवार,बाजीराव पाटील रियाज पठाण हे उपस्थित होते