धाराशिव : उमरगा शहरात रिक्षाचालकांचा वाढता त्रास, शहरातील प्रमुख महामार्गवर होणाऱ्या अतिक्रमण यावर लवकरात-लवकर लक्ष घालून मार्ग काढण्यात यावा, रिक्षाचालकांना एक पार्किंग पॉईंट करून त्या ठिकाणी आपले वाहन थांबवण्यास सांगावे या मागणीचे निवेदन पोलीस प्रशासनाला व्यापारी महासंघातर्फे देण्यात आले .
शहरातील मुख्य बाजारपेठेत ये जा करतांना मुख्य मार्गावरून अंतर्गत येणाऱ्या रस्त्यालगत तीन चाकी ऑटोरिक्षा अर्ध्या रस्त्यात उभारहून ग्राहकांची वाट पाहतात यामुळे बाजारपेठेत येण्यासाठी नागरिकांना, महिलांना नाहक त्रास होतो. त्यांना कोणी दुकानदार अथवा सुजाण नागरिक रिक्षा काढण्यासाठी सांगितले असता लागलीच तक्रार करण्यास सुरुवात करून अरेरावेची भाषा वापरली जाते असा उल्लेख या निवेदनात करण्यात आला आहे.यासाठी अशा रिक्षाचालकांवर लवकरात लवकर कारवाई करून व त्यांना एक पार्किंग ठिकाणी उभरण्यास सांगावे असे निवेदन व्यापारी महासंघाच्या वतीने देण्यात आले.
छ. शिवाजी चौकात संक्रान्त सणानिमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची वाढती वर्दळ आणि त्यात असा रिक्षाचालकांचा त्रास व रस्त्यालागत उभा असलेल्या वाहनाचा त्रास यामुळे बाजारपेठेत होणाऱ्या ग्राहकांवर परिणाम होत आहे.अशा प्रकारचे संबंधित विभागाला यापूर्वी ही निवेदन व तोंडी चर्चा करून सुद्धा यावर काहीच कारवाई होत नाही. याची दाखल पोलीस प्रशासनाने घ्यावी अशी विनंती यावेळी करण्यात आली.
सचिन बिद्री