लोन अँप व ऑनलाईन पार्ट टाईम जाॅब सारख्या सायबर फ्रॉडपासून स्वतःचे रक्षण करा व सायबर गुन्हेगारीला आळा घाला.

(सचिन बिद्री)

दि. 10 रोजी पो अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पो.अधिक्षक गौहर हसन यांच्या मार्गदषानाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ए.आर.जाधव यांच्यासह पो.अमंलदार षषिकांत हजारे, मकसुद काझी,षरद जाधवर महिला पो.अं.शेख यांनी छ.शिवाजी मा. व उच्च माध्यमिक विदयालय,धाराषिव येथे सायबर गुन्हे या विशयावर सायबर जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सायबर पोलीस स्टेषनचे महिला पो.उपनिरीक्षक ए.आर.जाधव यांनी विदयार्थाना मार्गदर्षन करताना सांगीतले की ,शालेय विदयार्थी हे शिक्षणासाठी घरापासून शहरात हाॅस्टेल व इतर ठिकाणी वास्तव्यास असतात.शिक्षणासाठी शहरात राहत असताना सदर विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व उदयनिर्वाहसाठी पैशाची आर्थिक अडचण निर्माण होते. अशावेळी विदयार्थी ऑनलाईन लोन अॅप किंवा आॅनलाईन पार्ट टाईम जाॅबच्या माध्यमातून आर्थिक अडचण दूर करण्याचा प्रयत्न करतात व आपल्याला असलेल्या सायबर गुन्हेगारीविशयीच्या अपु-या ज्ञानामुळे सायबर गुन्हेगारीस बळी पडतात. अशावेळी विद्यार्थ्यांनी मोबईल व इंटरनेटचा सुरक्षित वापर कसा करावा व सायबर गुन्हा घडू नये याबाबत काय काळजी घेतली पाहिजे याबाबतचे सखोल मागदर्षन सदर या कार्यषाळेमार्फत देण्यात आले.या कार्यशाळेत विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.एन.पाटील,शिक्षकवर्ग व जवळपास 500 विदयार्थीवर्ग उपस्थित होता.

—घ्यावयाची काळजी—–

1.संवेदनषील माहिती जसे की बॅक खाते तपषील,आाधार किंवा पॅन माहिती, एखादया अविष्वासू मोबाइल अॅपलिकेषनवर अपलोड करू नये.
2.तुम्ही तुमच्या फोनवर कोणत्याही अॅपला कोणत्याही परवाणगी देताना काळजी घ्यावी.
3.व्याजदराबददल संपूर्ण खूलाासा असल्याची खात्री करा.
4.अविष्वासू मोबाईल ऍप्स किंवा एपिके फाईलस डाउनलोड करणे टाळा.

—-सायबर गुन्हा घडल्यास काय कराल—

1930 हेल्पलाईन नंबरवर काॅल करा किंवा www.cybercrime.gov.inवर तक्रार नोंद करा. तसेच सायबर पोलीस स्टेषन येथे जावून तक्रार दया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *