माजी खासदार प्रा.रविंद्र गायकवाड व
आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या विकसनशील नेतृत्वावर विश्वास ठेवुन दि.07 रोजी युवानेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन माजी उमरगा युवक काँग्रेस शहराध्यक्ष आयुब लदाफ, चांद लदाफ, शरीफ बानकर, आरिफ शेख, अब्दुल बागवान, फारूक शेख, कैफ जमादार, अलीम लदाफ, इस्माईल शेख, इरफान मुल्ला, तौफीक मुल्ला, अल्ताफ शेख, असलम लदाफ, फयाज जमादार, अहेमद शेख, मुस्ताक शेख, अजीम शेख, उमर शेख, अतिक लदाफ यांच्यासह काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मराठवाडा युवासेना निरीक्षक किरण गायकवाड यांच्या हस्ते शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल व शिवसेना पक्ष संघटना बळकट कराल, असा विश्वास किरण गायकवाड यांनी व्यक्त केला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख योगेश तपसाळे, शरद पवार,सचिन जाधव, वसीम लदाफ, जाहेद मुल्ला, फिरोज जमादार, रहीम बागवान, ताहेर शेख आदीसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
