धाराशिव : कागा हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी व लदाख येथे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये आईस हॉकी या खेळासाठी निवड झालेल्या साई प्रताप राठोड, ओम राठोड, सत्यगणेश गालीपील्ली यांचा व राज्यस्तरीय शालेय ज्युदो स्पर्धेत सिल्व्हर मेडल कु.अस्मिता पाटील व डॉ.बाबासाहेब विद्यापीठीय स्पर्धेत गोल्ड मेडल पटकवलेल्या कु.सुहानी घोडके या सर्व विद्यार्थ्यांचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या वतीने दि 15 रोजी सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, भाजपचे शेखर मुदकन्ना, अरुण जगताप, राठोड सर, विद्यार्थी सेनेचे संदीप चौगुले, माजी सरपंच राम मुकडे, बालेपिर शेख, फजल कादरी, स्वप्नील पवार आदी जण उपस्थित होते.
सचिन बिद्री