सचिन बिद्री:धाराशिव
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील आंदोलन करत आहेत आणि जोपर्यंत त्यांच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत संपूर्ण गाव आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीवर बहिष्कार घालणार असून कुठल्याच राजकीय पक्ष्याच्या कार्यक्रमात सहभागी तथा प्रतिसाद देणार नाही असा निर्णय दि 2 मार्च रोजी लोहारा तालुक्यातील होळी ग्रामस्थानी कोअर कमिटीच्या बैठकीत घेतला आहे.
यामध्ये मराठा समाजास मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार आरक्षण मिळेपर्यंत आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक मतदान प्रक्रियेवर संपूर्ण गावाचा बहिष्कार असेल. कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही व गावात कोणत्याही पक्षाचा प्रतिनिधी आला तर कोणीही प्रतिसाद देणार नाही.तसेच बैठकीमध्ये मराठा समाजाची कोअर कमिठी तयार करण्यात आली. त्यांनी घेतलेले निर्णय सर्व समाजास लागू राहतील व आगामी लोकसभा निवडणुकीत गावच्या वतीने 2-3 उमेदवार देण्याचे ठरले आहे.होळी गावात संपन्न झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत वरील विषयावर एकमत झाले आहे.
मराठा कोअर कमिटीचे राजेंद्र महारुद्र जाधव – अध्यक्ष, अजित माधवराव जाधव – सचिव, युवराज गोविंद कोकाटे – उपाध्यक्ष, राम प्रभाकर जाधव – सदस्य, प्रा. गोविंद द. जाधव – सदस्य, संजय ओमप्रकाश मनाळे – सदस्य,संजय इराप्पा बिराजदार – सदस्य,संजय भीमा कांबळे – सदस्य,व्यंकट सिद्राम माळी – सदस्य, बालाजी मडोळे – सदस्य,लक्ष्मण राठोड ग्रापसदस्य – सदस्य, केशव भानुदास सरवदे – सदस्य,आणि माधव जमादार आदी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.