तालुकाध्यक्ष शशिकिरण मुगळे तर सचिवपदी शरद पवार
उमरगा:धाराशिव
देशभरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक संघटनेमध्ये धाडस सामाजिक संघटनेचे नाव गणले जाते. या संघटनेचे ब्रीदवाक्य ” अन्याय सहन करणार नाही, अन्याय करू देणार नाही ” असे असून या ब्रीदवाक्याप्रमाणे तंतोतंत पालन करून समाजातील अन्यायग्रस्त, वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचा सतत ही संघटना प्रयत्न करते.
धाडस संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद ( दादा) कोळी यांच्या आदेशानुसार, व मागदर्शक सौ.सुरेखाताई मुळे, जिल्हाध्यक्ष महंमदरफी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या . उमरगा तालुकाध्यक्ष शशिकिरण मुगळे, सचिवपदी शरद पवार,तालुका उपाध्यक्षपदी प्रदीप माने, संपर्कप्रमुख मारुती मुगळे, युवक तालुकाध्यक्ष सुनील राठोड, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष सागर जमादार यांच्या निवडी जाहीर केल्या असून स्वतः शरद दादा कोळी उपस्थित राहून नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.