प्रतिनिधी ( नळदुर्ग )
तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग येथील धक्कादायक घटना समोर . स्थानिक गुन्हे शाखा कारवाई(चार तासात गुन्हा उघड)- मयत नामे- शिवमल्हार दयानंद घोडके, वय 10 वर्षे रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हा दि. 28.03.2024 रोजी रात्री घरासमोरील ज्योर्तिलिंग ज्वलर्स दुकानासमोर त्याच्या वडीलासह झोपला असता सकाळी त्याचे वडीलास झोपलेल्या ठिकाणी तो मिळून न आल्याने त्याच्या वडीलांनी व नातेवाईकांनी त्याचा आजू बाजूला शोध घेतला असता त्यांचे घराजवळील बाधंकाम चालू असलेल्या हौदात त्याची बॉडी मिळून आल्याने पोलीस ठाणे नळदुर्ग येथे अपघाती मृत्यु क्र 28/2024 अन्वये नोंद घेण्यात आली होती.

सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. कासार यांना गुप्तबातमीदारा मार्फत व तात्रिंक विशलेषनातुन निष्पन्न झाले की, सदर मयत मुलगा नामे शिवमल्हार दयानंद घोडके, वय 10 वर्षे रा. नळदुर्ग यास त्याची सावत्र आई नामे सुंदरबाई दयानंद घोडके, वय 50 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी कौटुंबिक वादातुन सदर मयत यास झोपेत असताना उचलून नेवून शेजारील नविन चालू असलेल्या बांधकामावरील पाण्याच्या हौदात बूडवून ठार मारले आहे. सदर आरोपीस पथकाने ताब्यात घेवून तिच्या कडे गुन्ह्यासंदर्भाने चौकशी केली असता तिने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली.पुढील कार्यवाही कामी नमुद आरोपीस पो स्टे नळदुर्ग येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक- श्री. वासुदेव मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक- श्री. सुदर्शन कासार, नळदुर्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वप्निल लोखंडे. पोहेकॉ/ शौकत पठाण, फरहान पठाण, प्रकाश औताडे, विजयकुमार घुगे, शोभा बांगर पोलीस अमंलदार योगेश कोळी नितीन भोसले यांच्या पथकाने केली आहे.