उमरखेड :
मागील अनेक वर्षांपासून
मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे येत्या 4 जून रोजी मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण करणार असून मराठा आरक्षणाचा विषय पेटणार आहे. या गांभीर्य विषयी तात्काळ कुणबी मराठा सगे – सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून उमरखेड येथील नगरपालिकामध्ये बंदिस्त असलेले छत्रपती शिवरायांचा पुतळा मोकळा करून नियोजित जागेवर बसवण्यात यावा या मागणीच्या आशयाचे निवेदन येथील सकल मराठा बांधवांनी दि 24 मे रोजी तहसीलदार यांना दिले आहे .
दिलेल्या निवेदनातून दोन्ही मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या दि 6 जून रोजी येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणासमोर सचिन घाडगे ,गजानन जाधव, प्रकाश जाधव हे समाज बांधव आमरण उपोषण करतील असा निवेदनातून इशारा दिला आहे .
मागील बऱ्याच वर्षापासून मराठा आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे महाराष्ट्रभर सकल मराठा समाज बांधवांनी आमरण उपोषण अनेक प्रकारचे आंदोलने केली परंतु अद्यापही राज्य सरकारने यावर कोणतेही प्रकारचे ठोस पाऊल उचलले नसून मराठा आरक्षण ओबीसी मध्ये देण्याऐवजी दहा टक्के एस इ बी सी मध्ये देऊन समाजाची फसवणूक केली आहे . कुणबी मराठा सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी त्वरित करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील दिनांक 4 जून पासून आमरण उपोषणास बसणार आहे व त्यांना पाठिंबा म्हणून उमरखेड येथील सकल मराठा समाज बांधवांनी अनेक आंदोलने उपोषण केलेत .त्यामुळे सर्व मराठा समाज एकवटला आहे उमरखेड नगर परिषदेमध्ये मागील दोन वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बंदिस्त करून ठेवले आहे ते त्वरित मोकळे करून दि 6 जून राज्य राज्याभिषेक दिनापर्यंत महाराजांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्थापन करावा अन्यथा वरील दोन्हीही मागण्यासाठी दि 6 जून 2024 पासून तहसील कार्यालय येथे मराठा आंदोलन कर्ते सचिन घाडगे , गजानन जाधव जेवली ,प्रकाश जाधव हे मराठा बांधव अमरण उपोषणाला बसणार असल्याचे तहसीलदार यांना निवेदनातून इशारा दिले आहे यावेळी उमरखेड येथील सर्व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते .

चौकट ।

मराठा आरक्षण पेटणार

मागील अडीच वर्षापासून नगरपरिषद येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा जागेच्या वादामुळे बंदिस्त ठेवण्यात आले आहे .त्यातच मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय गंभीर बनत चालला आहे या दोन्ही विषयी शासनाने गांभीर्य पूर्व लक्ष देत पूर्ण करावे अन्यथा येत्या 6 जून रोजी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल जर शासनाने या विषयी दखल न घेतल्यास मराठा समाज आक्रमक भूमिका घेईल असे यावेळी मराठा आंदोलनकर्ते सचिन घाडगे यांनी सांगितले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *