डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ

उमरखेड :- स्थानिक माहेश्वरी चौकात आज दिनांक ३० मे रोजी आमदार नामदेव ससाने व जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनात शहराध्यक्ष प्रकाश दुधेवार यांच्या नेतृत्वात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

      शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी  काल दिनांक २९ मे रोजी महाड येथील चवदार तळ्याजवळ आंदोलना दरम्यान श्रद्धेय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून  त्याची नीच मानसिकता दाखऊन दिली . व्देषांध झालेल्या आव्हाडनं यापूर्वीही निळा ध्वज फेकून दिला होता हाच यांचा खरा आहे  जितेंद्र आव्हाडचा निषेध करण्याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष  चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार जितेंद्र आव्हाडच्या फोटोला जोडेमारो आंदोलन करण्यात आले या वेळी किसन वानखेडे, अजय बेदरकर, महेश काळेश्वरकर, विश्वपाल धुळधूळे, संजय भंडारे,सुधाकर लोमटे, माधव इंगळे, पुंडलिक कुबडे,आनंद चिकणे,अतुल खंदारे, सागर घुगरे, पवन मेंढे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *