उमरखेड
दिनांक ५ जून २०२४
उमरखेड नगर परिषद चे कर्मचारी कृष्णा लांबटिळे हे सफाई कामगार या पदावर कार्यरत आहेत. परंतु लांबटिळे यास न प प्रशासनाने कर विभागात सध्या कार्यरत ठेवलेली आहे. कृष्णा लांबटिळे कर विभागात कार्य करताना नगरपालिकेचे प्रशासकीय कामे कमी व शहरात लावणाऱ्या अनाधिकृत बॅनर धारकाकडून पैसे वसूल करीत आहे. आणि ज्या व्यक्तीने नियमानुसार पैसे भरून लावलेले बॅनर मुदतीचे आत काढून गैर कायदेशीर काम करीत आहे. त्यांनी वरील प्रमाणे केलेल्या सर्व गैरप्रकाराची चौकशी करून कारवाई करावी तसेच नियमानुसार तो सफाई कामगार असल्याने कर विभागातून काढून त्या सेवेत दिलेली काम करण्याचे संबंधाने त्या सफाई कामगार विभागात कार्यरत करावे. अन्यथा नाही नाईलाजास्तव तीव्र आंदोलन करावे लागेल असा ईशारा संयुक्त पत्रकार संघामार्फत न.पा. मुख्याधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळेस संयुक्त पत्रकार संघाचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.