पोलादपूर शहरातील श्री शिवकृष्णा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री शंकरराव गोपाळराव महाडिक इंग्लिश मिडियम शाळेचा सलग नवव्या वर्षी सुद्धा 100% निकालाची परंपरा कायम ठेवली असून ओम मंगेश मोरे 92% गुण मिळवून प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला असून वेदांत अनंत गोळे याने 82% गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला असून श्रावणी विजय महाडिक हिने 81.60% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकावला आहे. दहावी बोर्ड परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देत शाळेचे संचालक शंकरराव महाडिक व अध्यक्षा मंगलाताई महाडिक, उपाध्यक्ष बाबूराव महाडिक, मनोज महाडिक, मुख्याध्यापिका प्रतिभा उतेकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे, पालकांचे व मार्गदर्शन करणा-या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
Skip to content