पोलादपूर (देवेंद्र दरेकर)
पोलादपूर शहरातील मठगल्ली येथील विहिरीत कुत्रा पडल्याने ओरडण्याचा आवाज येत असल्याने भाऊ सुर्वे यांनी भ्रमणध्वनी द्वारे रेस्क्यू टीम ला माहिती देतात रेस्क्यू करत कुत्र्याला बाहेर काढण्यात यश आले सदरची घटना रविवारी सकाळी घडली आहे.
शहरातील मठगली येथील भाऊ सुर्वे यांनी विहिरीत कुत्रा पडला असल्याचे दिसून आल्यानंतर त्यांनी श्री काळभैरवनाथ रेस्क्यूला संपर्क केला या नंतर त्या विहिरीत नायलॉन दोरीच्या साह्याने प्रथम जाधव हे विहिरीत उतरत पडलेल्या कुत्र्याला बाहेर काढले जवळ पास 60 ते 70 फूट विहिरीत उतरत जाधव यांनी कुत्र्याला बांधत वरती असलेल्या दीपक उतेकर ,दिनेश दरेकर, उमेश पालकर ,अविनाश दाभेकर, रोहन वाडीले व भाऊ सुर्वे यांच्या प्रयत्नांनी सुखरूप जीवदान देण्यात आले . त्यांच्या या कार्याचे कौतुक होत आहे