रेवली आदिवासी वाडी वरील युवकाचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू
कानात इयरफोन घालून रेल्वे पटरीवरून चालत जाणे बेतले जीवावर
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रेवली आदिवासी वाडी वरील जयराम कृष्णा वाघमारे या युवकाचा रेल्वेचे धडकेने मृत्यू
रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील रेवली आदिवासी वाडी वरील युवकाचा रेल्वे पटरीवरून कानात इयरफोन घालून पायी चालत जात असताना पनवेलकडून रोहाकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्सप्रेसने दि.८जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास रेल्वे ने. रोहा तालुक्यातील रेओली आदिवासी वाडी येथील जयराम कृष्णा वाघमारे वय वर्ष २३ असे या मयत युवकाचे नाव असून याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मयत जयराम कृष्णा वाघमारे वय वर्ष २३ रा. रेओली आदिवासीवाडी पो मेढा रोहा हा रोहा तालुक्यातील मेढा गावाच्या हद्दीतील पोल क्रमांक १३७/१६ चे जवळील रेल्वे पटरी वरून कानात इयरफोन घालून पायी चालत जात असताना पनवेलबाजूकडून रोहा बाजूकडे येणारी नेत्रावती एक्सप्रेस गाडी क्रमांक १६३४४५ हिने ठोकर दिल्याने सदर अपघातात मयत जयराम कृष्णा वाघमारे याचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला दरम्यान सदर घटनेची नोंद रोहा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
एन टी व्हि न्युज साठी
प्रतिनिधी नरेश कुशवाहा
रोहा रायगड