section and everything up until
* * @package Newsup */?> मंगरुळपीर येथे जखमी वासराला बचाव पथकाकडुन दिले जीवदान | Ntv News Marathi

वाशिम :- मंगरुळपीर येथील अकोला रोडवर एका वासराला अज्ञात पिकअप गाडीने धडक दिली त्यात सदर वासरु तडफडत आहे अशी माहीती संत गाडगेबाबा बचाव पथकाला कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठुन जखमी वासरावर पशुवैद्दकीय डाॅक्टरकडुन ऊपचार करुन वासराचा वेळीच मदत करुन जीव वाचवल्यामुळे बचाव पथकातील कार्यकर्त्यांचे सर्वञ कौतुक होत आहे.
मंगरुळपीर येथील अकोला रोडवरील किराणासमोर एका अज्ञात पिकअप वाहनाने वासराला ऊडवले त्यात सदर वासरु जखमी असल्याची माहीती सामाजिक कार्यकर्ते तथा पञकार फुलचंद भगत यांना प्रा.शरद वाघोळे यांनी कळवताच संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन आणी बचाव पथकाचे अतुल उमाळे,गोपाल गिर्‍हे आणी लखन खोडे यांना दिली.त्या पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठुन जखमी वासराला ऊचलुन साईडला ठेवले.पशुवैद्दकीय डाॅक्टरलाही बोलवले व डाॅक्टरच्या मदतीने जखमी वासरावर योग्य तो उपचार करुन सदर वासराच्या मालकाचा शोध घेवुन ते त्यांच्या स्वाधीन केले.मुक्या जनावरांसाठी अशाप्रकारे तात्काळ मदत मिळवुन त्यांचे प्राण वाचवणार्‍या टिमचा सर्वञ गौरव होत असुन तोंडभरुन कौतुक होत आहे.

परिसरात कोणत्याही आपत्तीकाळात संत गाडगेबाबा बचाव पथकाचे कार्यकर्ते सर्देव तत्पर असतात.मागच्याच आठवड्यात एका गाईलाही असेच वाचवले होते तसेच जखमी वानरालाही सुखरुप वाचवुन डाॅक्टरच्या मदतीने ऊपचार करुन निसर्ग अधिवासात सोडले.विविध प्रकारच्या आपत्ती काळात हे बचाव पथक तारणहार बनले असुन या संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांच्या नेतृत्व आणी मार्गदर्शनात सेवाभावी दृष्टिकोनात जनसेवेसाठी आपत्तीमध्ये विघ्नहर्त्याची भुमीका सर्वजन बजावतात.प्रशासनाने यांच्या कार्याची योग्य दखल घेवुन यथोचीत सन्मानित केल्यास बचाव पथकातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढुन धिक जोमाने आणी प्रोत्साहनाने कार्यकर्ते काम करतील.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *