उमरखेड :- महाराष्ट्राचे आराध्य दैवत वारकऱ्यांचा जीव की प्राण पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीच्या निमित्ताने गावागावातील शेकडो महिला पुरुष वारकरी मंडळी दर्शनासाठी आषाढी व कार्तिकी एकादशीच्या वारीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होतात . महाराष्ट्रात वारकऱ्यांचा मोठा सांप्रदाय आहे .अशा या सांप्रदायाच्या उमरखेड तालुका महिला अध्यक्षपदी येथील कृष्णनगर स्थित वारकरी सौ . सिंधुताई विनायकराव पाटील माने चातारीकर यांची महिला वारकरी राऊत दारव्हेकर साहित्य परिषद संघटनेच्या दारव्हा येथे विठ्ठल मंदिरात झालेल्या यवतमाळ जिल्हा अध्यक्ष ह भ प गुलाब महाराज राऊत दारव्हेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली आहे . यावेळी नवनियुक्त तालुका अध्यक्ष ह भ प प्रकाश महाराज राणे हे उपस्थित होते सिंधुताई यांच्या निवडीमुळे महिला वारकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त होत असून त्यांचे वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे .