सचिन बिद्री:उमरगा
उमरगा तालुक्यातील तलमोड स्थित भारत शिक्षण संस्था संचलित छ.शिवाजी विद्यालयात मुख्याध्यापक शाळेचे मुख्याध्यापक विराज मोरे यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह हुंडाप्रथा अश्या अनिष्ठ मन पिळवटून टाकणाऱ्या प्रथेविरुद्ध जनजागृती मोहीम दि 5 जुलै रोजी कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करण्यात आले, आणि त्यांच्या सामाजिक कार्यावर उपस्थित विद्यार्थ्यांना सखोल माहिती देण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ शिक्षक माळी करबस यांची उपस्थिती होती.
बालविवाह निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या स्वयंसेविका आयेशा औटी यांनी बालविवाह म्हणजे काय.? याचे दुष्परिणाम आणि शिक्षणाचे महत्व आयुष्यातील ध्येय यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक महेश सूर्यवंशी यांनी केले तर सुञसंचलन जाधव जे.जी.यांनी करुन अभार श्री.राठोड एन.एच.यांनी मानले.
याप्रसंगी प्रशालेतील श्रीमती. बिराजदार ए.एस.,श्रीमती वडदरे एन.टी,शिक्षकेत्तर कर्मचारी मोरे पी.बी. आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.