एकुरगा ग्रामस्थांचे उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन

उस्मानाबाद:सचिन बिद्री


उस्मानाबाद :
उमरगा तालुक्यातील एकुरगा ग्रामपंचायत कार्यालयातील संगणक परिचालक यांची बदली करण्यात यावी यासाठी एकुरगा ग्रामस्थांच्या बतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सोमवार, दि. २७ सप्टेंबर रोजी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले.
ग्रामस्थांनी संबधित परीचालक बाबत वारंवार तक्रार देऊनही गटविकास अधिकारी यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. तक्रारी बाबत विचारणा केली असता धमकी दिली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच “आपले सरकार सेवा केंद्र” मार्फत सुविधा मिळणे बाबत सखोल चौकशी करून योग्य न्याय द्यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी ग्रामस्थांच्या वतीने उपविभागीय कार्यालय उमरगा समोर एक दिवसीय आंदोलन छेडण्यात आले होते. दरम्यान या संदर्भात उपविभागीय अधिकारी यांना ९ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. त्या अनुषंगाने दि. २७ रोजी आंदोलन छेडण्यात आले असल्याचे उपोषण कर्त्यांनी Ntv न्युज मराठीशी बोलताना सांगितले.सदर निवेदनावर बसवेश्वर करके, गुलाब कुन्हाळे, नरसिंग बोंडगे, रमाकांत कुन्हाळे, किशोर करके, विश्वनाथ करके, प्रकाश म्हात्रे, अमर करके, किसन जेवळे, विनोद करके, सिद्ध करके सुनील गायकवाड, तानाजी करके, सुनील जवळगे आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *