section and everything up until
* * @package Newsup */?> सातलिंग स्वामींच्या सेवानिवृत्ती सोहळ्यात बच्चू कडुचा सरकारवर प्रहार | Ntv News Marathi

महाराष्ट्राला कडू आणि या विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज -बच्चू कडू

तुम्ही जणतेचा आवाज व्हा:मी स्वतः तुमच्यासोबत आहे-बच्चू कडू

(सचिन बिद्री :उमरगा)

आमदार आणि जनतेमध्ये सेवाभाव नसेल तर त्या आमदार आणि जनतेचा नातं टिकू शकत नाही. जात, धर्म, पन्थच्या पलीकडे जाऊन मानवतेचे बिजारोपण करणं आवश्यक. धर्मभाव पेक्षा सेवाभाव अधिक महत्वाचे असे मत दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष तथा प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू यांनी दि 29 रोजी उमरगा शहरातील शांताई मंगल कार्यालयात आयोजित सातलिंग स्वामींच्या स्वेच्छा सेवा निवृत्ती सोहळ्यात बोलत होते.श्री 108 सिद्धलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान आळंद, श्री 108 डॉ शांतवीरलिंग शिवाचार्य महास्वामी हिरेमठ संस्थान औसा आणि लोहारा तालुक्यातील श्री 108 अभिनव सूतरेश्वर महास्वामी हिरेमठ संस्थान अचलेर,जंगम समाज प्रमुख श्री. म्हांतय्या स्वामी यांच्या दिव्य सानिध्यात हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बच्चू कडू होते.


पुढे बोलताना आमदार कडू म्हणाले कि,एखादा आमदार आजारी पडल्यावर सरकारच्या तिजोरीतील दोन कोट रुपये खर्च करतो तर त्याला आमदार बनविणारा मतदार आजारी पडल्यावर मात्र केवळ पाच लाख रुपये..? हा दुजाभाव कां.? असा प्रश्न उपस्थित करत सरकारवर हल्लाबोल करीत “जो सेवा विधायक को मिलती हैं वही सेवा मतदार को मिलनी चाहिये”असे खडसावून त्वेशाने बोलत होते. ज्या शाळेत श्रीमंताची पोरं शिकतात त्या शाळेत शेतकरी, मजूर, कामगारांची पोरं शिकली पाहिजेत त्यासाठी मतदार जागा झाला पाहिजे. हातात कुठल्याही रंगाचा झेंडा घेण्यापेक्षा तिरंगा आधी घ्या. बदल घडवून आणण्याची धमक मतदारांमध्ये असतें ती फक्त जागृत होणे आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातुन सामान्य माणसाचा आवाज सभागृहात येणे आवश्यक आहे. सातलिंग स्वामी येथील तुम्ही जनतेचा आवाज व्हा, तुमच्या सोबत मी स्वतः बच्चू कडू आहे. या महाराष्ट्राला कडुची गरज आहे आणि उमरगा लोहारा विधानसभेला सातलिंग स्वामींची गरज आहे.
सातलिंग स्वामी यांनी
सत्काराला उत्तर देताना मला पूर्वीपासून गोरगरीब,दीन दुबळ्या, कमकुवत असलेल्या लोकांच्या समस्या सोडवण्याची आवड आहे.सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन आपल्या समस्त जनतेची अमर्याद सेवा करण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुक लढवण्याचा निर्धार केला आहे. आपण सर्व उमरगा लोहारा मतदारसंघातील मतदारांनी मला आपला मतदानरुपी आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवावे असे आवाहन केले. आमदार जनतेसाठी मोलाचा असतो. आमदार मी नसून येथील प्रत्येक मतदार असणार आहे असेही यावेळी म्हणाले.
या भव्य सोहळ्यात जि. प. माजी अध्यक्षा गोदावरी केंद्रे, जि. प. कृषी व पशुसंवर्धन माजी सभापती अॅड. दिपक अलुरे, प्रहार जिल्हाध्यक्ष वर्षद शिंदे, प्रहार दिव्यांग संघटनेचे मयूर काकडे, उमरगा बार कौन्सील अध्यक्ष अॅड. गोविंद गायकवाड, शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे उमरगा तालुकाध्यक्ष संजय पवार, प्रफुलकुमार शेटे, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष शरद पवार, तालुकाध्यक्ष अण्णासाहेब पवार, कम्युनिस्ट नेते अरुण रेणके, सुरेश हरीशचंद्र पवार, डॉ. मल्लिनाथ मलंग,शिवराज पाटील, अॅड. सयाजी शिंदे,हरीश डावरे,पोलिस पाटील संघटनेचे महेशंकर पाटील आदीसह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुतात्मा स्मारक पासून मंगलकार्यालयापर्यंत आमदार बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली. दरम्यान छ. शिवाजी महाराज्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बाजारपेठेत शिवरायांच्या जयघोशाने कार्यकर्त्यांनी दानाणून सोडले होते.या रॅलीमध्ये “आपणा भिडू बच्चू कडू,आपणा नेता कैसा हो बच्चू कडू जैसा हो, सातलिंग स्वामी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है” इत्यादी घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला होता.
मंगल कार्यालयात कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी विविध पक्ष संघटना पदाधिकारी, कार्यकर्ते,उमरगा- लोहारा मतदारसंघातील दिव्यांग बांधुभगिनी, आदिंसह विविध क्षेत्रातील मान्यवर शेतकरी, मजूर, कामगार, कर्मचारी वर्ग आदी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.आभार प्रा. डॉ. वीरभद्रेश्वर स्वामी आणि जगदीश सुरवसे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *