अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांचा इशारा
गडचिरोली : आष्टी परिसरात बिबट्याचे मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.या हल्ल्यात एका बालकाला आपला जीव गमवावा लागला व अन्य दोघे जखमी झालेत. वनविभागाकडे या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा अशी मागणी करूनही वनविभागाने या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे परिणामी बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे.वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरू करावी अशी मागणी आष्टीचे माजी सरपंच ,शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केली आहे.
घटना घडल्यानंतर वनविभागाला वारंवार सूचना देऊनही मात्र वनविभागाने या प्रश्नाकडे कायम दुर्लक्षित पणाची भूमिका घेतली आहे. या बिबट्याचा दहशतीने आष्टी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकरी आपल्या शेतात पीक पाहणीसाठी व इतर शेतीच्या कामांसाठी जाण्यास धजावत नाही आहेत.बिबटया भरदिवसा गावात येऊन पाळीव प्राणी व मानवावर हल्ला करीत आहे तरीही वनविभाग झोपेचे सोंग घेतल्या सारखे वागत आहे.या नरभक्षक बिबट्याचा हल्ल्यात मानवी हानी झाल्यास वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा.अशी मागणीही त्यांनी केली.या बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी राकेश बेलसरे यांनी दिला आहे.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली