अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा काँग्रेस सरचिटणीस संजयराव पंदिलवार यांचा इशारा

गडचिरोली : आष्टी परिसरात बिबट्याचे मानवी हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे.या हल्ल्यात एका बालकाला आपला जीव गमवावा लागला व अन्य दोघे जखमी झालेत. वनविभागाकडे या नरभक्षक  बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करा अशी मागणी करूनही वनविभागाने या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे परिणामी बिबट्याच्या हल्ल्यात वाढ झाली आहे.वनविभागाने याची गंभीर दखल घेऊन या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरू करावी अशी मागणी आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदिलवार व काँग्रेस सरचिटणीस संजयराव पंदिलवार  यांनी केली आहे.
  घटना घडल्यानंतर वनविभागाला वारंवार सूचना देऊनही मात्र वनविभागाने या प्रश्नाकडे कायम दुर्लक्षित पणाची भूमिका घेतली आहे. या बिबट्याचा दहशतीने आष्टी परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत. शेतकरी आपल्या शेतात पीक पाहणीसाठी व इतर शेतीच्या कामांसाठी जाण्यास धजावत नाही आहेत.बिबटया भरदिवसा गावात येऊन पाळीव प्राणी व मानवावर हल्ला करीत आहे तरीही  या नरभक्षक बिबट्याचा हल्ल्यात मानवी हल्ल्यात जखमी झालेल्या कुटुंबाना पाच  लाख रुपये व कूटूबातील एका  सदस्यांना नौकरी देण्यात यावी  अशी मागणीही त्यांनी केली.या बिबट्याचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी काँग्रेस सरचिटणीस संजयराव पंदिलवार  यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *