गडचिरोली : जिल्ह्यातील उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमके कोटी हद्दीतील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या अबुजमाड भागातील मौजा कोपर्शी व मौजा फुलणार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी मोठा कॅम्प लावला असल्याचा व घातपाताची मोठी योजना असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे विशेष अभियान पथकाचे जवान रवाना करण्यात आले विशेष पथकाचे जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये सलग तीन चकमकी घडून आल्या पोलीस जवानांनी न डगमगता त्यांना प्रत्युत्तर देत सडेतोड उतर देत नक्षलवाद्यांना सळो कि पळो करून सोडले यात पोलीस जवानांना नक्षलवाद्यांच्या मोठा कॅम्प उद्ध्वस्त करण्यात मोठे यश मिळाले
अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे पोलीस उपनिरीक्षक (अभियान) भाऊसाहेब ढोले c60 अहेरी प्राणहिता चे प्रभारी अधिकारी योगीराज जाधव यांनी सदर नक्षल विरोधी अभियान यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले
