अन्यथा एकही वाहन जाऊ देणार नाही-काँग्रेस सरचिटणीस संजयराव पंदिलवार
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात येत असलेल्या आष्टी ईलूर येथे असलेली पेपर मिल सन 2016 पासून बंद पडलेली आहे पाच वर्षापासून उत्पादन बंद असताना आता हळूहळू काही मशनरी बल्लारपूर येथील पेपरमध्ये स्थानांतरित करण्यात आले आहेत त्यामुळे ही पेपरमिल पुन्हा सुरु न करता यूनीट गुंडाळण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येते आधीच उद्योग धंद्याची मारामार असलेल्या या जिल्ह्यात यामुळे कामगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे सध्या युनिट बंद असल्याने बऱ्याच रोजंदारी कर्मचाऱ्यांना घरी बसावे लागले तर स्थायी कामगारांना बलारपूर येथे पाठवण्यात आले बी जी पी एल युनिट आष्टी येथील ए फोर साईज पेपर कटिंग मशीन ठेवण्यात आली होती त्यामुळे काही कर्मचारी या ठिकाणी काम करीत होते आता ती मशीनही स्थलांतरित करण्यात आल्याने पेपर मिल कायमस्वरूपी बंद होण्याच्या मार्गावर आहे करिता मोजक्याच कामगारांना काम न देता ए फोर मध्ये सर्वांना काम ध्या या युनिटमध्ये काम करणाऱ्या स्थायी कर्मचाऱ्यांना आष्टी येथून पेपर मिलच्या वाहनाने रोज बल्लारपूर येथे जाणे येण्याची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे रोजंदारी कर्मचारी यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे तेव्हा अस्थायी कामगारांना नाहीतर सर्व कामगारांना काम देण्यात यावे अन्यथा या ठिकाणाहून एकही वाहन जाऊ देणार नाही असा इशारा जिल्हा परिषद सदस्य सौ रूपालीताई पंदीलवार व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस तथा सामाजिक कार्यकर्ते श्री संजय भाऊ पंदीलवार यांनी दिला आहे