आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. मागील काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्याने ते घालवले आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
पुण्यात रोहित पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. आरक्षण देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावे. पण होते असे की, आरक्षण दिले जाते आणि तिथं सत्तेत जी लोकं आहेत, जसे की देवेंद्र फडणवीस. त्यांचीच लोकं मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात जातात. काँग्रेस-राष्ट्रवादीने १६ टक्के आरक्षण दिले होते. ते कोर्टात जाऊन सदावर्तेंनी हाणून पाडले. हे सदावर्ते कोणाचे कार्यकर्ते आहे, हे जगजाहीर आहे.”