मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या हजारो बहिणींनी महायुती सरकारच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. रक्षा बंधनाच्या पुर्वेसंध्येला योजना यशस्वीतेचा आनंद बहिणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना राख्या बांधून व्यक्त केला.


निमित्त होते भारतीय जनता पक्षातर्फे संपूर्ण राज्यात आयोजित केलेल्या लाडक्या बहिणींशी संवादाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बहिणींशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उत्तर नगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महीलांनी प्रवरानगर येथे डॉ.धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, उत्‍तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सरचिटणीस नितीन दिनकर, डॉ.विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष कैलास तांबे आदी उपस्थित होत्या. सर्व बहिणींतर्फे मंत्री विखे पाटील यांना सन्मानित करून महायुती सरकारप्रती कृतज्ञता व्यक्त केली.