विविध क्षेत्रातील व्यक्तींचा होणार सन्मान
उमरगा तालुक्यातील साप्ताहिक विश्वविनायक न्यूज रिपोर्टच्या वतीने लोहारा-उमरगा तालुक्यातील विशेष नामवंतांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा निर्णय साप्ताहिक विश्वविनायकाच्या कार्यकारी मंडळींनी घेतला आहे. सामाजिक, शैक्षणिक उपक्रमाध्ये ज्यांनी स्वतःच्या आयुष्याचे समर्पण केले. अशा विशेष व्यक्तींना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती संपादिका प्रियंका गायकवाड यांनी जाहीर केले. हा कार्यक्रम दि. २५ ऑगस्ट २०२४ रोजी उमरगा येथील श्रीराम मंगल कार्यालयात संपन्न होत असून मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेला आहे.
या सोहळ्यात आ.ज्ञानराज चौगुले,शिवसेना युवा नेते किरण गायकवाड,प्राचार्य डॉ. श्रीकांत गायकवाड,नितीन बनसोडे, निवेदक आकाशवाणी, सोलापूर,कैलास शिंदे,विश्वनाथ तोडकर,धनंजय रणदिवे, हरी लवटे गुरुजी (महाराज), आणि शहाजी पाटील आदि मान्यवर उपस्थित असणार आहेत.
या सोहळ्यात विशेष सन्माननीय व्यक्तींना मानाचा पहिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
यामध्ये या विशेष व्यक्तींचा सन्मान होणार आहे.
१) प्रा. डॉ. महेश मोटे २) डॉ. लक्ष्मण सातपुते ३) श्री. अमर सूर्यवंशी
४) विजया भूमिपुत्र वाघ
५) शेषेराव लवटे
६) तानाजी पवार
७) ज्योती कावळे
कार्यक्रमासाठी परिसरातील मित्र, पत्रकार, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील कार्यकत्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.