आगामी विधानसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी बोगस मतदान घडवून आणण्यासाठी बोगस मतदार नोंदणीचा मोठा स्कॅम झाला आहे, असा खळबळजनक आरोप शहर महाविकास आघाडीतर्फे करण्यात आला आहे.याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेनेच्या संयुक्त शिष्टमंडळातर्फे लेखी हरकत घेण्यात आली आहे. खासदार निलेश लंके यांचे हरकत घेणारे लेखी पत्र महाविकास आघाडीने प्रशासनाला दिले आहे. यावेळी राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अल्पसंख्याक काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, राष्ट्रवादी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष निलेश मालपाणी आदी उपस्थित हाेते. नगर शहर विधानसभा मतदार यादीमध्ये सुमारे २४ ते २५ हजार दुबार नावे आहेत.

यामध्ये मयत व्यक्तींची नावे जाणीवपूर्वक वगळण्यात आली नाहीत. राहुरी, श्रीगोंदे, पारनेर या मतदारसंघांमध्ये समाविष्ट असणाऱ्या नावांची नगर शहरात दुबार नोंदणी करण्यात आली आहे. याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास निवडणूक प्रशासनाविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा देण्यात आला.
