पुणे येथील पालकमंत्री नामदार तानाजीराव सावंत साहेब यांच्या जीएसपीएम कॅम्पस नऱ्हे या ठिकाणी भव्य असा पक्षप्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी आरोग्य दूत डॉ. राहुल घुले मित्रपरिवार भूम परंडा वाशी यांचा पक्षप्रवेश घेण्यात आला याप्रसंगी डॉ.राहुल घुले बोलत होते.
कुठल्याही पदाची/ फळाची अपेक्षा न ठेवता विकास पुरुष असणारा ध्येयवादी समाजकारणे व्यक्तिमत्व असणारे रजकीय व्यक्तिमत्व
डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या कामकाजावर गेल्या एक वर्षापासून नजर ठेवून होतो जो माणूस कोणाचाही विचार न करता लोकांच्या इतिहासाची झटणारा असेल तर अशा नेत्यांसोबत आपण राहणार योग्यच राहील अशा हेतूने मी मागील दोन वर्षापासून भाऊ परंडा वार्षिक तालुक्यांमध्ये जे समाजकारण करत आहे आरोग्य सेवा देत आहे ते अवेरितपणे सुरू ठेवून येणाऱ्या भविष्यकाळामध्ये लोकांच्या हितासाठी तानाजीराव सावंत साहेब यांच्या माध्यमातून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करत आहे याप्रसंगी तानाजीराव सावंत साहेब यांनी असे सांगितले की 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण अशी बोल असणारे आमचे स्वर्गवासी नेते हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाप्रमाणे काम चालू असून मला ज्या ठिकाणी डॉक्टर राहुल घुले यांचे गरज असेल त्या ठिकाणी ते माझ्यासोबत पक्षासाठी छातीठोकपणे उभा राहतील आणि ज्यावेळेस डॉ राहुल घुले यांना कुठलीही गरज भासेल त्यावेळी मोठा भाऊ म्हणून मी त्यांच्यासोबत खंबीरपणे खांद्याला खांदा लावून उभा राहील असे आश्वासन देत डॉक्टर राहुल घुले व त्यांची टीम यांचे शिवसेना पक्ष प्रवेश झाला असल्याचे घोषित केले.
पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये शेतकरी संघटनेचे भाऊसाहेब मुंडे ,सचिन जाधवर, श्रीकांत कुठे, बालाजी कुठे, मैनुद्दीन शेख, सौ, मीनाक्षी काळे, मुसाभाई शेख व इतर शेकडो कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला