जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात सोमवारी सायंकाळी दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धार्मिक धर्मगुरू परमआदरणीय हिज होलीनेस डॉ. मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी आणि दर्शनासाठी मध्यप्रदेशासह जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतून हजारो समाजबांधव यावलमध्ये दाखल झाले होते.

यावल शहरात सोमवारी सायंकाळी दाऊदी बोहरा समाजाचे सर्वोच्च धार्मिक धर्मगुरू परमआदरणीय हिज होलीनेस डॉ. मुफद्दल सैफुद्दीन साहेब यांचे उत्साहात आगमन झाले. शहरातील बुरूज चौकात आगमन झाल्यानंतर मेन रोडवरून दाऊदी बोहरा समाजाच्या मस्जिदपर्यंत त्यांची मिरवणुकीसदृश स्वागतयात्रा काढण्यात आली. यावेळी समाजबांधवांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.

मस्जिदमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या दाऊदी बोहरा समाजबांधवांना धर्मगुरूंनी मार्गदर्शन केले. अनेक समाजबांधवांनी त्यांचे दर्शन घेतले. त्यांच्या आगमनामुळे समाजबांधवांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

शहरातील काझीपुरा मस्जिदमध्ये प्रवचन पार पडल्यानंतर त्यांनी शहरातील दाऊदी बोहरा समाजाच्या एका पिठाच्या गिरणीला तसेच स्कायएस जोहर कलर पॉइंट आणि कुर्बान हुसेन मोहंमद अली यांच्या दुकानाला भेट दिली. त्यानंतर ते भुसावळकडे रवाना झाले.

धर्मगुरूंच्या या दौऱ्यानिमित्त डीवायएसपी अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक एम. जे. शेख, उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *