मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेत नगर जिल्ह्यातील पात्र महिलांची संख्या आता दहा लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. जिल्ह्यात या योजनेत ९ लाख ९७ हजार महिला पात्र ठरल्या आहे. पहिल्या टप्प्यात पात्र ठरलेल्या ६ लाख ९० हजार महिलांच्या खात्यावर योजनेचे प्रत्येकी ३ हजार प्रमाणे दोन महिन्यांचे पैसे वर्ग झाले आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली.


नगर जिल्ह्यातून आतापर्यंत १० लाख ३३ हजार महिलांनी योजनेत अर्ज केले असल्याची माहिती जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागातर्फे देण्यात आली. योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात वेगवेगळ्या कारणामुळे राहिलेल्या ३ लाख २५ हजार महिलांचे अर्ज गेल्या चार ते पाच दिवसात जिल्हा प्रशासनापर्यंत ऑनलाइन आलेले आहेत. आलेल्या अर्जापैकी २ लाख ८५ हजार महिलांचे अर्ज स्कुटणी नव्याने मंजूर करण्यात आलेले आहेत. अद्याप ४० हजार अर्जाची स्कुटणी बाकी असून ती आज होण्याची शक्यता आहे. यामुळे नगर जिल्ह्यात दहा लाख लाडक्या बहिणींना सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार आहे.