वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचा व्यवस्थापक दत्तू सांगळे याला साडेपाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नगर येथील पथकाने ही कारवाई केली.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाकडून इलेक्ट्रॉनिक व्यवसायासाठी तक्रारदाराला कर्ज हवे होते. ही कर्जाची रक्कम मंजूर करून देण्यासाठी दत्तू सांगळेने साडेपाच हजार रुपयांची लाच मागितली. ही लाच स्वीकारताना त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ पकडले. आरोपी सांगळे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
