नगर जिल्ह्यातील उत्पादित होणार्‍या कृषी मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शिर्डी विमानतळ परिसरात स्वतंत्र मालवाहू इमारत बांधण्याचा प्रस्ताव होता. त्याबाबतचा अहवालही आला आहे. या इमारतीसाठी अंदाजित खर्च ५५ कोटी असून हा प्रकल्प पंतप्रधान गती शक्ती योजनेचा भाग म्हणून समाविष्ट करण्यात आला आहे.


नगर जिल्ह्यात लॉजिस्टीक नोड्स होणार आहे.  महाराष्ट्र राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी तसेच आगामी १० वर्षांत विकासाला अधिकाधिक चालना मिळावी, राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती व्हावी, यासाठी ७ ऑगस्ट रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत लॉजिस्टिक धोरणास मान्यता दिली आहे. आता याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. राज्याच्या या लॉजिस्टिक धोरणामुळे प्रकल्पांना देऊ केलेल्या विशेष प्रोत्साहने व सुविधा यामुळे राज्यात अंदाजे ५ लाख इतकी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. त्याचप्रमाणे आगामी १० वर्षात एकंदरीत अंदाजे महसुली उत्पन्न रुपये ३०५७३ कोटी इतके अपेक्षित आहे.