फुलचंद भगत
वाशिम:-सद्या महाराष्ट्रापासून देशापर्यंत अबला नारी, महिला, निरागस मुलींवर अमानुष अत्याचारांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मात्र समाजाने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून खबरदारी घेतली पाहिजे, असे आवाहन करत श्री.धानोरकर आदर्श माध्यमिक व ऊच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मुली आणि स्त्रियांचे रक्षण केलेच पाहिजे, असा संदेश देत दहीहंडी फोडली.फलक हातात घेत दहीहंडीला सलामी देत दि.२७ आॅगष्ट रोजी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आणी दुसरीकडे विद्यार्थींनीही एकमेकांवर तीन थर लावत स्त्री रक्षणाचे घोषवाक्य लिहिलेले फलक हातात घेत दहीहंडीला सलामी दिली.
दहिहांच्या ऊत्सवानिमित्य विद्यार्थ्यांनी ठेका धरत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.राधा-कृष्णच्या वेशभूषेत आलेल्या निरागस मुलांच्या हातातील स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे, लैंगिक अत्याचार थांबले पाहिजेत, असे घोषवाक्य लक्ष वेधून घेत होते.विद्यार्थ्यांनी मुली आणि स्त्रियांचे रक्षण केलेच पाहिजे, असा संदेश देत दहीहंडी फोडली. गोविंदा रे गोपाला…अशा वेगवेगळ्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी ठेका धरत दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटला.हा आनंदोत्सव श्री धानोरकर आदर्श माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,धानोरा(खुर्द) ता.मंगरुळपिर जि.वाशीम संस्थेच्या कोषाध्यक्षा,शाळा समिती अध्यक्षा तथा माजी प्राचार्या श्रीमती रजनीताई धानोरकर,विद्यालयाचे प्राचार्य श्री.मंगेशभाऊ धानोरकर,माध्यमिक विद्यालय विभाग प्रमुख सौ.ए.एम.धानोरकर,श्री.जी.एस.उचित,सौ.वाय.ए.होले,श्री जी व्ही पाटील,श्री.वैभव डी.धानोरक,श्री.ए.टी.ढेंगळे,श्री.जी.एस.सावके,श्री.सि.जे.झळके,श्री.पी.आर.भगत,श्री.विक्रम,पी.धानोरकर,श्री.आर.एस.चारखोड यांचेसह विद्यार्थी आणी विद्यार्थीनींची ऊपस्थीती होती.
प्रतिनिधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206