ऑगस्ट महिन्यात शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमा अंतर्गत कळंब तालुक्यातील जिल्हा परिषद नाथवाडी शाळेतील शिक्षिका शितल सोळुंके (देशमुख) यांचा निपुणभारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आणि प्राथमिक शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता प्रगतीसाठी अनमोल शैक्षणिक कार्य केल्या बद्धल जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षण विभाग धाराशिवच्या कार्यक्रमात सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
मंगळवार (ता २७.) जिल्हा गुणवत्ता कक्ष व जिल्हा सुकाणू समिती बैठकीचे आयोजन यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आले होते.
या विशेष बैठकीत नाथवाडी जिल्हा परिषद शाळेच्या गेल्या महिन्यात शिक्षणाधिकारी अशोक पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी भेटी देऊन पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान आणि प्राथमिक शिक्षणातील शैक्षणिक गुणवत्ता याची तपासणी केली होती.या तपासणीत शाळेची गुणवत्ता, पायाभूत सुविधा पाहुन नाथवाडी शाळेतील शिक्षिका शितल अशोकराव सोळुंके यांना जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या कार्यक्रमात निमंत्रित करुन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, शिक्षणाधिकारी अशोक पाटील, प्रमुख पाहुणे अप्पर जिल्हा अधीक्षक गौहर हसन यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा समृद्ध शाळा या अभियानामध्ये मागील वर्षी जि प प्रा शाळा भाट शिरपुरा शाळा विभागात प्रथम क्रमांक आल्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री बाळकृष्ण तांबारे यांचा देखील सन्मान करण्यात आला .त्या बद्दल त्यांचे येडशी गावतुन कौतुक होत आहे
प्रतिनिधी रफिक पटेल
येडशी धाराशिव