सचिन बिद्री :उमरगा
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील एकुरगावाडी येथील तुळजाभवानी अपंग मतिमंद अनाथांची शाळा असून विविध उपक्रम येथील शिक्षक मोठ्या आपुलकीने राबवीत असतात आणि या अनाथ बालकांतील सुप्त गुणांना चालना देत असतात. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गोपाळकालाचे आयोजन या बालगृहात आयोजित करण्यात आले होते.यावेळी दहीहंडीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले.
याप्रसंगी लाल घरातील अनाथ मुलांना श्रीकृष्ण बद्दलची सविस्तर माहिती सांगून या अनाथ मुलांमधील ‘लकी’ या बालकाला भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये साकारण्यात आले होते. त्यानंतर बालगृहाच्या भव्य प्रांगणामध्ये थोड्या उंची वरती दहीहंडी बांधण्यात आली होती व सर्व मुलांचा गुच्छ करून वरती श्रीकृष्णांना थांबवून दहीहंडीची मटकी फोडण्यात आली. त्यामुळे सर्व अनाथ मतिमंद मुले अति आनंदाने उत्साहाने नाचत होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मालगावचे मुख्याध्यापक ,अधीक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले