सचिन बिद्री:उमरगा
तालुक्यातील आष्टा जहागीर येथे दि.२७.रोजी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच सतिश जमादार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली, ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामूक्ति गाव समितीची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.अध्यक्षपदि संजय उर्फ बालाजी मोरे तर उपाध्यक्षपदि महादेव पाटील यांची निवड करण्यात आली,समितीच्या सदस्यपदी सरपंच सतिश जमादार,उपसरपंच बापूराव गायकवाड,ग्रामपंचायत सदस्य पि एम कांबळे, ग्रामपंचायत सदस्या अर्चना ताई सुर्यवंशी,सविता भोसले, अल्पसंख्य प्रतिनिधि रूक्मोद्दीन शेख, बचत गट प्रतिनिधि लक्ष्मी पाटील,पत्रकार प्रतिनिधि आदिनाथ भालेराव, माजी सैनिक प्रतिनिधि नरसींग सुर्यवंशी,युवक प्रतिनिधि यशवंत गायकवाड, शासकीय प्रतिनिधि ग्रामसेवक ए.सी.राठोड तर सचिव पदि पोलिस पाटील महेश जाधव अशी समिती गठीत करण्यात आली.
नुतन अध्यक्ष उपाध्यक्षाचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतिने करून सन्मानित करण्यात आले.ग्रामसभेसाठी ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी ताई,आशा सेविका सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.