🛑महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर असलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडल्यानंतर याचे पडसाद आता संपूर्ण राज्यभरात पाहायला मिळत आहेत. अशातच या घटनेचा निषेध करत या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.


🛑छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला, याची सखोल चौकशी करून दोषी असणार्‍याला कायमचं जेलमध्ये टाका. कायदाच एवढा जरब बसला पाहिजे, की कुठल्या महापुरुषाचा अपमान करण्यापूर्वी त्याने दहा वेळा विचार केला पहिजे. छत्रपती शिवराय हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. त्यांचा पुतळा अशा पद्धतीने कोसळणे हे फार वेदनादायक आहे. त्यामुळे राज्य सरकारने यात हस्तक्षेप करून तातडीने याची चौकशी करा, अन्यथा याचे सखोल परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.