🛑विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. नगर जिल्ह्यातील उमेदवारांना उमेदवारी मिळवण्यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे, उमेदवारांनी मुदतीत अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे.

🛑विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष मोठ्या ताकदीने घटक पक्षांसहित एकत्रीतपणे निवडणुकीला सामोरे जाणार आहे. नगर येथील राष्ट्रवादी भवनात हे अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. उमेदवारी मिळण्यासाठी इच्छुकांनी ५ तारखेपूर्वी अर्ज जमा करायचे आहेत. विहीत वेळेत दाखल केलेले परिपूर्ण अर्जच पक्षाची उमेदवारी निश्चित करताना विचारात घेण्यात येणार आहे, असे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.
