फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील यशवंतराव चव्हाण पुर्व प्राथमिक इंग्लीश स्कुलमध्ये चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शिक्षकदिनाच्या निमित्ताने शाळेत साजरा करण्यात आलेल्या ऊपक्रमाअंतर्गत शिक्षक बनुन ज्ञानदानाचे कार्य केले.शिक्षकाप्रति असलेला आदर आणी भुमिका या दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या मनात रुजवणुक व्हावी यासाठी शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला.
य.च.पुर्व प्राथमिक शाळेत दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन मोठ्या ऊत्साहात साजरा करण्यात येतो. विद्यार्थी या दिवशी त्यांच्या शिक्षकांबद्दल कृतज्ञता आणि कौतुक व्यक्त करतात. महान शैक्षणिक तत्ववेत्ता, आणि एक प्रख्यात मुत्सद्दी, विद्वान, भारताचे राष्ट्रपती आणि सर्व शिक्षक या महान शिक्षकाला श्रद्धांजली म्हणून त्यांचा वाढदिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. 5 सप्टेंबर रोजी य.च.स्कुलमधल्या विद्यार्थ्यांनी शिक्षक बनुन शिकवण्याचे कार्यही पार पाडले.हा कार्यक्रम मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मार्गदर्शनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी राबवला.शाळेच्या गायन-गायकांनी गायलेल्या प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या नंतर विद्यार्थी आपापल्या वर्गात रवाना झाले. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका घेतली व विद्यार्थ्यांसाठी वर्ग घेतला. इतर सर्व भाग न
घेतलेले विद्यार्थीही आवाज न करता गंभीरपणे अभ्यास करीत होते. शेवटी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आणी शिक्षकवृंदांनी पुष्पगुछ देऊन कौतुक केले.अतिशय उत्साहाने शिक्षक दिन साजरा झाला.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *