उदगीर (प्रतिनिधी) महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले. उदगीर सेवाकेंद्र संचालिका ब्रह्माकुमारी महानंदा दीदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची शासकीय अतिथी गृहात पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी ‘स्वर्णीम भारत – सतयुगातील प्रथम राजकुमार श्रीकृष्ण’ सुंदर छायाचित्र राष्ट्रपतींनी स्वीकारले. ऊर्जा लेखापरीक्षक केदार खमितकर यांनी ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर भारतासाठी ब्रह्मा कुमारीस विद्यालयातर्फे आयोजित ‘वीजबचत’ ‘ इंधन बचत’ आदी विविध सामाजिक सेवा – लोक-जनजागृती अभियानाचा संक्षिप्त अहवाल सादर केला. याप्रसंगी राष्ट्रपती मुर्मू यांनी ब्र.कु.विद्यालयाच्या सदस्यांना पाहून समाधान व्यक्त केले. ब्र.कु. सुनीता, ब्र.कु. नीता, ब्र.कु. छाया, ब्र.कु. मीरा, ब्र.कु. सुलक्षणा, ब्र.कु. ज्योती, ब्र.कु. ज्ञानसागरभाई, ब्र.कु. केदार, ब्र.कु. नितीन आदी सदस्यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *