♦️नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये करण्यात येणाऱ्या नोकरभरतीच्या प्रक्रियेस स्थगिती देण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ही भरती प्रक्रिया राबविणाऱ्या वर्क वेल या कंपनीवर खासदार लंके यांनी आक्षेप घेतला आहे. बेकायदेशीरपणे पॅनलवर नेमलेल्या या कंपनीस पॅनलवरून दूर करण्याची मागणी खासदार लंके यांनी केली आहे. या संदर्भातील पत्रात खासदार लंके यांनी नमुद केले आहे की, वर्क वेल कंपनीचा सहकार आयुक्तालयाने बेकायदेशीरपणे तालिकेत समावेश केला आहे. राज्यातील अनेक विभागांच्या भरती प्रक्रियेसाठी या कंपनीची निवड करण्यात आली आहे. वर्क वेल कंपनीचा अनुभव पाहता शासनाच्या आदेशात नमुद केल्याप्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी सहकारी बँका तसेच शासनातील विविध विभागांसाठी किमान तीन वेळा ऑनलाईन नोकर भरती प्रक्रिया राबविल्याचा अनुभव असला पाहिजे ही अटच कंपनी पात्र करीत नसल्याकडे खासदार लंके यांनी लक्ष वेधले आहे.

You missed