प्रतिनिधी
उमरखेड :
ईद -ए – मिलादुन्नबी निमित्त आज शहरातून काढलेली मिरवणूक सिरत कमीटीच्या पुढाकाराने काढुन शांततेत समारोप केला आहे .
सदरील मिरवणूक दि . 28 रोजी काढण्याची पोलिस प्रशासनाने विनंती केली होती त्या विनंतीस सकारात्मक प्रतिसाद देत दिनांक १९ सप्टेंबरला गणेश उत्सव मिरवणूक असल्याने येथील मुस्लीम समाज बांधव व सिरत कमिटीने पुढाकार घेत १९ तारखेची मिरवणूक आज दि. 28 रोजी मोहम्मद पैगंबर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमासह सकाळी 9 पासून येथील तातारशाह बाबा दर्गा येथुन भव्य मिरवणूक डीजे लावून काढण्यात आली .
यावेळी मिरवणुकीच्या प्रारंभी सिरत कमिटीचे अध्यक्ष अब्दुल समद यांनी युवकांना मार्गदर्शन करून मिरवणुकीला सुरुवात केली .
यावेळी इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या स्मृतिपित्यर्थ काही वचने म्हणण्यात आली .जुलूसे ए मोहम्मद सकाळी 9 वाजता स्थानिक तातारशहा बाबा दर्गा येथून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली तेथून मुख्य मार्गाने मार्गक्रम करीत दुपारी चार वाजता स्थानिक गांधी चौक मध्ये मिरवणुकीची सांगता झाली .
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी जगाला दिलेली शांती आणि मानवतेची शिकवण समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचावी यामागील उद्देश असल्याचे काही मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आले .
यावेळी शहरातील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई , पताके, झेंडे लावून सजावट करण्यात आली होती मिरवणुकीमध्ये सहभागी झालेल्यांसाठी सामाजिक संघटना कार्यकर्त्यांकडून शरबत व अल्पउपहार , पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातून निघालेल्या मिरवणुकीत विविध ठिकाणांहून निघालेल्या रॅली मध्ये शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते .
शहरात कुठल्याही प्रकारचे अनुचित घटना घडू नये म्हणून कालपासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक पियुष जगताप , उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड ,ठाणेदार संजय साळुंखे सह जिल्ह्यातील पाचशेच्या वर पोलीस कर्मचाऱ्यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
चौकट :
आज उमरखेड शहराला ‘भाईचारा ‘ या वाक्याची गरज असल्याने आम्ही पोलिस प्रशासनाची विनंती मान्य केली . याला आजच्या मिरवणूकीत विशेष करून हिंदु बांधवांनी , पोलिस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तसेच माझ्या मुस्लिम बांधवांनी सहकार्य करून उमरखेडात भाईचारा हमेशा राहिल याचे उदाहरण निर्माण केल्याने मी सर्वाचा आभारी आहो .
अ . समद
सिरत कमिटी अध्यक्ष , उमरखेड .