उमरखेड 🙁 प्रतीनीधी )
देशाला स्वातंत्र्य प्राप्ती होउण सुमारे ७५ वर्ष पुर्ण होउण गेली असली तरीही अजुन पर्यन आदिवासी भागातल्या निंगणूर गट ग्राम पंचायत अंतर्गंत येत असलेल्या चिंचवाडी गांवाला अद्यापही रस्ताच नसल्याने वैद्यकीय , शैक्षणिक या मुलभुत सुविधा या पासुन दुर असल्याने अख्व गांवच आदिवासी समाजांचे असतांना गांवाला रस्ता च नंसल्याने संपर्कहिन परिस्थिती निर्माण झाली असुन जिल्हा परिषद विभागांकडुन रस्ता मंजुरी मिळाली असे सांगण्यात येते मंजूरी प्राप्त रस्ता आचार संहिता लागण्या पुर्वी करावा अन्यथा होऊ घातलेल्या विधान सभा निवडणुकीत कायम गांवकऱ्यांचा बहिष्कार राहिल अशी निर्धारात्मक तटस्थ भुमिका काँग्रेस चे जेष्ठ नेते माजी आमदार प्रकाश पाटिल देवसकर यांच्या विठ्ठलबाग निवास स्थानी घेन्यात आलेल्या पत्रकार परिषद मध्ये चिंचवाडी ग्रामस्थांनी निर्णय घेतला आहे
सन २०११ पासुन चिंचवाडी ग्रामस्थ शासनाकडे रस्ता मागणीचे निवेदने , उपोषण आजपर्यंत सातत्याने करित आले आहेत मात्र वण विभाग किंवा अभयारण्याची कुठलीही अचचण नसतांना या गांवाला वंचित ठेवल्या जात आहे फक्त रस्ता मंजुर झाला म्हणून समज काढण्यात येते मात्र प्रत्यक्षात मात्र रस्त्याचा कामाला सुरुवात होत नाही या बद्दल माजी आमदार प्रकाश पाटिल देवसकर यांनी शासनाचा निषेध करित खेद व्यक्त केला या गांवाला मुलभुत गरजा पासुन वंचित ठेवले तर लवकरच या प्रश्नी चक्काजाम आंदोलन छेडल्या जाईल असा ईशारा ही गांवातील नागरिक यांच्या समवेत माजी आमदार प्रकाश पाटिल यांनी दिला
या पत्रकार परिषदेला माजी आमदार विजय खडसे , माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश चव्हाण , चिंचवाडी नागरिक सुरेश खंदारे , पाडुरंग तडसे , हरिदास खंदारे , परमेश्वर भोयाळ , श्रावण खंदारे , मारोती मेंडके , माधव शेळके , मारोती गव्हाळे , राजाराम कपाटे , पाडुरंग टारपे , उत्तम हाडे , नामदेव टारपे यांच्या सह गांव नागरिक उपस्थित होते या आशयाचे निवेदन सुद्धा उप विभागिय अधिकारी , तहसिलदार व संबधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांना देण्यात आले
