या लोकन्यायालयामध्ये जिल्हयातील एकूण ३१ पॅनेलवर न्यायाधीश व विधिज्ञांनी काम केले. लोकन्यायालयासाठी आर. बी. रोटे जिल्हा न्यायाधीश १, जे. सी. ढेंगळे, श्रीमती. एम. एन. चव्हाण, लातूर तसेच लातूर मुख्यालयातील सर्व न्यायाधीशाचे व लातूर वकील मंडळाचे अध्यक्ष शरद इंगळे व पदाधिकारी, महाराष्ट्र बार कॉन्सीलचे सदस्य श्री. आण्णाराव पाटील यांचे सहकार्य लाभले.
तसेच या लोकअदालतीमध्ये पॅनलवर न्यायाधीश श्री.डी. बी. माने, श्री.आर.एम. कदम श्री. जी. सी. बेंगळे, श्रीमती. एम. एन. चव्हाण, श्रीमती. एस. पी. केस्तीकर नलगे, श्रीमती. जे. जे. माने, श्रीमती. एम. एस. निकम, श्रीमती. ऐ. ऐ. पिरजादे-पाटील, श्री. पी. एफ. शिंदे व अॅड. फड शिवाजी पाराजी, श्रीमती. अॅड तांबोळी रिहाना, के, श्री. अॅड राजमल्ले बालाजी पुंडलिकराव, श्रीमती. अॅड. ढगे नेहा. आय, श्रीमती, अॅड. केंद्रे स्वाती रमाकांत, श्री. अॅड. रणदिवे श्रीकृष्णा प्रभाकर, श्रीमती. अॅड कोंडमगिरे मिरा. एन, श्रीमती अॅड. शेख आयशा के, श्री. एन. पी. गायकवाड यांनी पॅनल पंच म्हणून कामकाज पाहिले.
लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी श्री. पी. पी. केस्तीकर सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर जिल्हा न्यायालयाचे प्रबंधक श्री. बी. के. राऊत, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रभारी अधिक्षक श्री. एन. डी. दोरवे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे, न्यायालयाचे सर्व कर्मचारी यांचे योगदान लाभले.